हमरस्ता नाकारताना : पारदर्शी जगण्याचे धैर्य
अलीकडेच सरिता आवाड यांचं ‘हमरस्ता नाकारताना’ (राजहंस प्रकाशन) हे आत्मकथन वाचलं. २८६ पानांचं हे पुस्तक अगदी प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे, हे पानोपानी जाणवत राहतं. कसलीही भीती न बाळगता, काहीही न लपवता यात आयुष्यातील अनेक घटना लेखिकेने तंतोतंत, मोकळ्या मनाने सांगितलेल्या आहेत. चरित्रलेखिका सुमती देवस्थळे यांची सरिता ही मुलगी. लहानपणापासूनच संवेदनशील, बुद्धिमान आणि स्वतंत्र विचारांची. चाकोरी सोडून …